मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 मार्च 2018 (10:46 IST)

साईंच्या चरणी जवळपास 71 लाखांचे सुवर्णदान अर्पण

शिर्डीत रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो साईभक्त  दर्शनासाठी हजेरी लावत असतात. 
साईभक्तांनी साईंच्या चरणी  रामनवमी उत्सवानिमित्त जवळपास 71 लाखांचे सुवर्णदान अर्पण केले आहे. 
गुरुस्थापन मंदिरासाठी 32 लाख 30 लाख रुपये किंमतीच्या 1133 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पादुका साईचरणी अर्पण करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशमधील नेल्लुगर येथील साईभक्त चन्ना रेड्डी सुवर्ण पादुका  यांनी दान केल्या आहेत.

रामनवमीच्या पार्शवभूमीवर साईबाबांवर सोन्याच्या दानाचा वर्षाव होत  आहे. साईबाबांच्या नियमित आरतीकरिता मुंबई येथील दानशूर साईभक्त जयंतभाई यांनी 39 लाख 1 हजार 688 रुपये किंमत असलेली 1351 ग्रॅम वजनाची सोन्याची पंचारती देणगी स्वरुपात दान केली आहे. तर रामनवमी अर्थात राम जन्मा निमित्त आज दिवसभरात साईचरणी 71 लाखांचे सोन सुवर्णदान प्राप्त झालं.