बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

'सामना'तून पाकिस्तानवर टीका

पवित्र रमजानच्या महिन्यात शनिवारी पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयात एका इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जेथे भारतीय अधिकाऱ्यांना गैरवर्तणुतीचा सामना करावा लागला. पाकिस्तानकडून मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीचा निषेध आता सर्वच स्तरांतून करण्यात येत आहे. राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटत असतानाच पाकिस्तानच्या या कृतीवर शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या 'सामना'तून ताशेरे ओढण्यात आले आहेत. 
 
मद्यप्राशन करुन त्याच नशेत झिंगणारं माकड, असा उल्लेख करत शिवसेनेकडून पाकिस्तानप्रतीची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. इफ्तार पार्टीच्या निमित्ताने पाककडून भारतीय अधिकाऱ्यांसोबत गडलेला प्रकार हा निंदास्पद असल्याचंही अग्रलेखातून म्हटलं गेलं आहे.