1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबई : 26 जानेवारीला संविधान रॅली

येत्या 26 जानेवारीला मुंबईत संविधान रॅली निघणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते या संविधान रॅलीत सहभागी होणार आहेत. या संविधान रॅलीमध्ये शरद पवार, राजू शेट्टी, फारुख अब्दुल्ला, शरद यादव, सीताराम येचुरी, तुषार गांधी या प्रमुख नेत्यांचाही सहभाग असेल. या देशात सुरू असलेली अराजकता, संविधानाच्या मूळ गाभ्याला लावण्यात येणारी नखं या विरोधात हा मोर्चा आहे.
 
या आंदोलनाला कोणताही झेंडा नाही हे आंदोलन पूर्णपणे अराजकीय आहे. हे जनतेचं आंदोलन आहे त्यामुळे यात कुणीही सामील होऊ शकतं असं, आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. ही रॅली बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरु होईल आणि गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तिचा समारोप होईल.