deepawali
✕

राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा

Updated: शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (22:57 IST)
  
राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ
 
राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापल्यानंतर या मुद्द्याच्या केंद्रस्थानी असलेल्या राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याची माहिती आहे. 'शिवतीर्थ'बाहेर नेहमीच्या तुलनेत पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
 
औरंगाबाद येथील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी पोलिसांना दिलेल्या 4मे रोजीच्या अल्टिमेटमचा पुनरुच्चार केला. त्यानंतर राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत चर्चा सुरू झाली आहे. मशिदीवर लावण्यात आलेले अनधिकृत भोंगे न हटवल्यास 4 मे पासून कार्यकर्त्यांनी मशिदीसमोरच दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावावी, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीर दोन समाजात तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गृहखात्यातही या प्रश्नावर गंभीरपणे चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नेमका काय निर्णय जाहीर करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यादरम्यान कुशावर्त तीर्थ येथे ध्वजारोहण सोहळा, मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

LIVE: महाराष्ट्र सरकार पुढील तीन वर्षांत ५०,००० इलेक्ट्रिक बसेस आणणार

३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पशुधनासाठी चारा कृती योजनेला मंजुरी देण्याची पंकजा मुंडे यांची घोषणा

विमल पान मसाला जाहिरात वादाप्रकरणी अजय देवगणने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

एफडीए मंत्री नरहरी झिरवाल यांनी नियमभंगावर कारवाई केली, ४ अधिकाऱ्यांना निलंबित केले

पुढील लेख
Show comments