संबंधित माहिती
- पवार कुटुंब या वर्षी दिवाळी साजरी करणार नाही, सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
- शरद पवार यांच्या कुटुंबाने यावर्षी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला
- अजित पवार यांनी मानव-बिबट्या संघर्षासाठी मदत आणि नियंत्रण योजना जाहीर केली
- लाडक्या बहिणींच्या E- KYCच्या अडचणी वाढल्या
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना अजित पवार कारणे दाखवा नोटीस बजावणार
शरद पवार आणि अजित पवार बारामतीत सभेत एकत्र आले
अजित पवार आणि शरद पवार बारामतीत विद्या प्रतिष्ठान शेक्षणिक संस्थेच्या वार्षिक सभेला एकत्र आले. या वेळी अजित पवारांनी विद्या प्रतिष्ठानमधील विकास कामांची पाहणी केली.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मधील व्हीआयटीमध्ये सर्वसाधारण सभा पार पडली आहे. या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने अध्यक्ष म्हणून शरद पवार ,विश्वस्त म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार,खजिनदार म्हणून युगेंद्र पवार उपस्थित होते.
गेल्या काही दिवसापासून अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र पाहायला मिळत आहे.शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील बैठकीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता परत एकदा एकत्र आले होते.
Edited By - Priya Dixit
