Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवार यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

Updated: मंगळवार, 29 जून 2021 (22:34 IST)
 
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते.
 
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
 
मंगळवारी (29 जून) मनी लाँडरिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आलं आहे.
 
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी (28 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी लगेचच शरद पवार यांची ' सिल्व्हर ओक' या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.
 
मुंबई शहरात कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची सोय करण्यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाला 100 सदनिका हस्तांतरित करण्याच्या म्हाडाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. अर्थात, त्यानंतर पर्यायी जागा देत यावर तोडगाही काढण्यात आला.
या सर्व भेटीगाठी आणि घडामोडींमुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असावी, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांसोबतची आपली बैठक ही बीडीडी चाळीसंदर्भात होती, असं सांगितलं आहे.
 
या भेटीबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे यांनी म्हटलं की, गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा सूर होता. प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रम होता. म्हाडाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती यामुळे नाराजी होती. त्यासोबत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने आघाडीत संभ्रमाचं वातावरण होतं. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी संजय राऊत मुख्यमंत्री आणि शरद पवारांना भेटले. आजही महाविकास आघाडीच्या विविध मुद्यांवर पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असावी.
 
 
 
 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

मनोज जरांगे पाटील यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे मराठा समाज संतप्त, जालना आणि बीडमध्ये महामार्ग रोखले

Vivo T5 भारतात लॉन्च, किंमत ₹34,999 पासून सुरू; 7050mAh बॅटरी, 50MP OIS कॅमेरा आणि 144Hz AMOLED डिस्प्लेसह

LIVE: मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये समोसे आणि पकोड्यांवर बंदी

देशातील तरुण एक मोठा विजय मिळवत आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

पुण्यात सुप्रिया सुळे यांचा डीजे नियम, गुन्हेगारी आणि फुरसुंगी कचरा डेपोच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल

पुढील लेख
Show comments