गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जून 2021 (16:02 IST)

राजू शेट्टी यांनी मुख्यंमंत्री यांच्याबाबत केली नाराजी व्यक्त

केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याला देशात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. शेतकरी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करत आहेत.  या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी माजी कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व इतर नेते उपस्थित होते.
 
यावेळी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात मत मांडले, तसेच राज्यशासनाने याबाबत ठोस भूमिका मांडावी, असा आग्रह शरद पवार यांच्याकडे धरला.
 
दरम्यान, राजू शेट्टी यांनी मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांना नवीन कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ मागितली पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठलेही उत्तर आले नाही, अशी खंत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. दरम्यान, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन विविध संघटनांच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले.