1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जुलै 2022 (15:05 IST)

शिर्डीत साईचरणी कोट्यवधीचे दान,गुरुपौर्णिमा उत्सवाच्या तीन दिवसात एकूण 5 कोटी 12 लाख

saibaba
गुरुपौर्णिमा उत्सवा दरम्यान साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांनी साईचरणी कोट्यवधीचे दान दिले आहे. तीन दिवसांत एकूण 5 कोटी 12 लाख रूपयांचे दान बाबांच्या झोळीत अर्पण केले आहे.
 
दोन वर्षाच्या कोरोना निर्बंधानंतर या वर्षी साईभक्तांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव पार पडला. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात तीन लाखांपेक्षा जास्त भाविकांनी साईदर्शनाला हजेरी लावली. शिर्डीत आलेल्या साईभक्तांनी बाबांच्या झोळीत सोने, चांदीसह कोट्यावधी रूपयांचे दान दिले आहे. उत्सवाच्या तीन दिवसात एकूण 5 कोटी 12 लाख रूपये भक्तांच्या देणगीतून प्राप्त झाले आहे.
 
दान पेटीत 2 कोटी 17 लाख देणगी, कांऊटरवर 1 कोटी 59 लाख, ऑनलाईन डोनेशन 1 कोटी 36 लाख , परकीय चलन 19 लाख, 22 लाखांचे सोने तर 3 लाख रूपयांची चांदी असे एकूण 5 कोटी 12 लाखांचे भरभरून दान भक्तांनी अर्पण केले आहे.