रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2022 (15:01 IST)

शिवसेना आमदार नितीन देशमुख यांची प्रकृती बिघडली

nitin deshmukh
शिवसेनेचे नाराज नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आमदारांचा एक गट गुजरातमधील सुरतमध्ये आहे. या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. त्यांच्यावर सुरत येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे कळते. दरम्यान, आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांकडून अकोला पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
 
 एकनाथ शिंदे यांच्या सोबत पश्चिम वऱ्हाडातील तीन आमदार आहेत. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख सुरत येथे असतांना त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला.  त्यांना हृदयात वेदना होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, नितीन देशमुख यांचा कुटुंबियांशी संपर्क झाला होता. तेव्हा त्यांनी अकोल्यात येत असल्याचे सांगितले होते. मात्र, ते अद्याप परत आले नसल्याने कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.