गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (15:28 IST)

शिवसेनेच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता : प्रवीण दरेकर

सरकार आघाडी सांभाळेल, तुमची आपली जबाबदारी काय आहे तर आपल्याला गाव सांभाळायचा आहे. हे गाव सांभाळत असताना आघाडीचा विचार नाही तर फक्त शिवसेनेचा विचार करायचा असल्याचे विधान शिवसेना नेते अनंत गिते यांनी केलं आहे.महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री शिवसेनामधील आहे परंतु शिवसेनेच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता येतायत असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. गितेंचे वक्तव्य संजय राऊत यांनी खोडलं आहे. यामुळे गितेंनी मांडलेली भूमिका योग्य आहे की, संजय राऊत यांची पक्षाची भूमिका योग्य आहे? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावे अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.
 
 गितेंच्या वक्तव्यासंदर्भात दरेकर यांनी म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने शिवसेनेवर दबाव टाकून पक्षाचा विस्तार करत आहेत. या सर्वाची वेदना, भावना अनंत गितेंच्या वक्तव्यातून आली असल्याचे मला वाटत आहे.अनैसर्गिक युती ही एक तडजोड होती असा उल्लेख गितेंनी केला असून तो खरा आहे. म्हणून शिवसेनेचे खच्चीकरण होत आहे. शिवसेनेचे आमदार ज्या ज्या विभागात काम करत आहेत त्यांना अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून निधी देण्याबाबतीत स्वःदुजाभाव असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
 
जिल्हा कमिटी नेमणूक, राज्य स्तरिय नेमणूक असो त्या ठिकाणी शिवसेनेचा मंत्री असूनही वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत.या सर्वामुळे अनंत गिती यांचे वक्तव्य आलं आहे की, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की, गितेंचे वक्तव्य संजय राऊत यांनी खोडलं आहे. या संदर्भात अनंत गितेंची भूमिका बरोबर आहे की,संजय राऊत यांची पक्षाची भूमिका आहे.हे जनतेला कळाले पाहिजे. शिवसेनेची काय भूमिका आहे की, गितेंची भूमिका बरोबर आहे की, संजय राऊत यांची पक्षाची भूमिका आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. गितेंनी पाठित खंजीर खुपसण्यासंदर्भात वक्तव्य केलं आहे. त्याच्याबाबत महाराष्ट्राला न्यात आहे. या राज्याचे सरकार बनवण्यासाठी कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार बनवले आहेत हे स्पष्ट दिसत असल्याचा घणाघात दरेकर यांनी केला आहे.