ganesh chaturthi

भावाला वाचविण्यासाठी गेलेली बहिणही शेततळ्यात बुडाली, दोघांचा मृत्यू

Updated: मंगळवार, 18 जानेवारी 2022 (16:06 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे रोमनवाडी -येराड येथे एक फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊस वर सचिन जाधव कामासाठी आहे. सोमवारी सचिन यांच्याकडे त्यांचे नातेवाईक अनिल पवार आपल्या कुटुंबाला घेऊन भेटावयास आले होते. ते कामानिमित्त विजयनगर येथे वास्तव्यास आहे. मुलगा सौरभ हा आयआयटी महाविद्यालयात शिक्षण घेत होता तर मुलगी पायल ही इयत्ता आठवीत होती. पवार कुटुंब सचिन जाधव यांच्याकडे भेटायला आले होते.
 
सौरभ आणि पायल हे फार्महाउस पाहण्यासाठी गेले असता काळाने त्यांच्या मुलांवर झडप घातली आणि सौरभचा पाय घसरून तो फार्महाउस जवळच्या शेततळ्यात पडला. आणि बुडू लागला . आपल्या मोठ्या भावाला वाचविण्यासाठी गेलेली बहीण पायल ही देखील पाण्यात बुडू लागली आणि क्षणातच हे दोघे भाऊ बहीण शेततळ्याच्या पाण्यात बुडाले आणि त्यांचा दुर्देवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळतातच सचिन जाधव आणि मुलांचे आईवडील शेततळ्याजवळ पोहोचले तो पर्यंत ते दोघे बुडाले होते. ही दुर्देवी घटना सोमवारी सांयकाळी घडली. घटनेची माहिती मिळतातच पोलिसांसह गावातील काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचे मृतदेह रात्री उशिरा मच्छीमार करणाऱ्या मुलांच्या मदतीने काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनास पाठविण्यात आले . मुलांचे मृतदेह पाहता आईने हंबरडा फोडला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments