शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नीट परीक्षेसाठी राज्यातील सहा नव्या केंद्रांचा समावेश

नीट 2018 परीक्षेसाठी यंदा 43 नव्या केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.  यामध्ये महाराष्ट्रातील सहा नव्या केंद्रांचा समावेश आहे. आतापर्यंत देशातील 107 सेंटर्सवर नीटची परीक्षा घेतली जात असे. यावेळी महाराष्ट्रातील सहा केंद्रांसह 43 केंद्रांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई उपनगर, बीड, बुलडाणा, जळगाव, लातूर आणि सोलापूरचा समावेश आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यांसदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली. नीट 2018 परीक्षा रविवारी 6 मे रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
 
नीटसाठी राज्यात आतापर्यंत मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, सातारा आणि कोल्हापूर ही दहा केंद्रं होती. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण केंद्रांची संख्या 16 वर पोहचली आहे.