गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (07:56 IST)

म्हणून महाविद्यालयात शिक्षकांनाच नोटीस बजावण्यात आली

पालघरमध्ये एका महाविद्यालयात शिक्षकांनाच नोटीस बजावण्यात आली आहे. यात पाच शिक्षकांनी जीन्स पॅन्ट घातल्या म्हणून त्यांना थेट नोटीस देण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी या नोटीसा बजावल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात शिक्षकांनी राष्ट्रीय पोषाख घातला नाही. शिक्षकांचे गणवेश कसे असावेत याबाबत नियम असतानाही या शिक्षकांनी त्याला कचऱ्याची टोपली दाखवली. शाळेत हे नियम प्रजासत्ताक दिनादिवशी पाळले न गेल्यानं 5 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. या शिक्षकांना नोटीस देण्यात आली आहे. शासकीय कार्यक्रमात जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट न घालता राष्ट्रीय पोशाख परिधान करावा असे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं काढलेल्या परिपत्रकात म्हटलं होतं. तरीही शिक्षकांनी जीन्स पँट घातल्यानं ही नोटीस बजावण्यात आली आहे.