1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (18:11 IST)

राकेश टिकैतः पोलिसांनी गोळीबार का केला नाही?

Notice was issued to Indian Farmers Union spokesperson Rakesh Tikait  BBC correspondent Samratmaj Mishra
दिल्ली पोलिसांनी भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांना नोटीस बजावली आहे. ठरवलेल्या मार्गाऐवजी दुसऱ्या मार्गावरुन ट्रॅक्टर रॅली काढल्याबद्दल आणि दिल्ली पोलिसांशी केलेल्या समझोत्याला तोडल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का करू नये असे प्रश्न या नोटिशीत विचारण्यात आला आहे.
 
याला उत्तर देण्यासाठी पोलिसांनी तीन दिवसांचा अवधी दिला आहे. त्यांच्या संघटनेतील ज्यांनी 26 जानेवारी रोजी दिल्लीत हिंसा केली अशांची नावेही दिल्ली पोलिसांनी मागितली आहेत. यावर टिकैत यांनी अद्याप आपण नोटीस वाचलेली नाही असं सांगितलं.
 
एएनआयशी बोलताना ते म्हणाले, एक माणूस येतो आणि तो लाल किल्ल्यावर झेंडा फडकवतो, पोलीस गोळीबार करत नाहीत. हे कोणाच्या आदेशावर झालंय? पोलिसांनी त्याला जाऊही दिलं. त्याला अटक झाली नाही. त्यावर काहीही कारवाई झाली नाही. कोण आहे तो? त्यानं सर्व समाजाला आणि शेतकरी संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.
 
दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच अनेक ठिकाणी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती. काही ठिकाणी या झटापटीचं हिंसक स्वरूप पाहायला मिळालं.
 
आज सिंघू बॉर्डरवरील शेतकरी आंदोलकांनी हा परिसर रिकामा करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तिरंगेका अपमान नही सहेगा हिंदुस्तान, सिंघू बॉर्डर खाली करो अशा घोषणाही त्यांनी दिल्या आहेत.
 
गाझीपूरमध्ये बत्ती गुल

उत्तर प्रदेशच्या गाझीपूर बॉर्डरवर काल मध्यरात्रीपासून बत्ती गुल झाली आहे. याठिकाणी रात्री पोलिसांची कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे याठिकाणी आंदोलनास बसलेल्या लोकांनी संपूर्ण रात्र जागून काढली.
 
बीबीसी प्रतिनिधी समिरात्मज मिश्र यांनी घटनास्थळी घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशीही बातचीत केली. आपण रात्री 12 वाजल्यापासून याठिकाणी आहोत.
 
पोलीस आपल्याला धमकावत असल्याचा आरोप यावेळी टिकैत यांनी केला. पोलीस आंदोलकांच्या तंबूंपर्यंत पोहोचू नयेत यासाठी एकामागे एक अशा पद्धतीने ट्रॅक्टर उभे करण्यात आले आहेत.
 
एफआयआरमध्ये दीप सिद्धू यांचं नाव
 
दिल्ली पोलिसांनी 26 जानेवारीच्या हिंसा प्रकरणात अभिनेता दीप सिद्धू आणि गँगस्टर लक्का सदाना यांची नावं FIR मध्ये घेतली आहेत. हिंसाचारात दीप सिद्धू सहभागी होते, असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं.