1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (08:13 IST)

मग मुख्यमंत्री कधी उठतात? अजित पवारांचा सवाल

ajit pawar
सरकारनेही जनतेला वेड्यात काढू नये, आम्हीही राजकारण केलं आहे. “वेदांता आणि फॉक्सकॉन यापेक्षा दुसरा मोठा प्रकल्प राज्यात येणार असं लॉलीपॉप सरकारकडून दाखवलं जात आहे. दुसरा प्रकल्प तर आलाच पाहिजे पण हासुद्धा प्रकल्प महाराष्ट्रात राहिला पाहिजे. तरूण तरूणींनी याविरोधात आवाज उठवला पाहिजे. अशी प्रतिक्रिया विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. आज ते जळगाव येथील सभेत ते बोलत होते.
 
दादा भुसे यांच्या मंत्रिपदावरून टोला लगावताना अजित पवार म्हणाले, “शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे हे राज्य आहे. इथे गद्दारी चालणार नाही. राज्यात आत्तापर्यंत फक्त १८ मंत्र्यांचा शपथविधी झालाय. त्यामधील १२ मंत्र्यांनी चार्जच घेतला नाही. तर पुढच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारासाठी पितृपक्षाचे कारण दिलं जातंय असा निशाणा लागवला.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काम करण्याच्या पध्दतीवर ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतात असं सांगितलं जातंय, पण मग मुख्यमंत्री कधी उठतात? असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.