शनिवार, 8 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (15:03 IST)

सोलापूर : मशरूम गणपतीचा सोन्याचा कळस बुधवारी पहाटे चोरीला

The mushroom Ganapati from the Hipparga lake near the city is the ornament of the city
अष्टविनायक गणपती पैकी सातवा गणपती म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तळे हिप्परगा येथील मशरूम गणपतीचा सोन्याचा कळस बुधवारी पहाटे चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे २८ तोळे सोन्याच्या मुलामा दिलेला २५ किलो वजनाचा हा कळस असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहा वर्षांनंतर दुसऱ्यांदा चोरट्यानं हे धाडस केलं आहे.
 
शहरापासून जवळच असलेल्या तळे हिप्परगा येथील मशरूम गणपती शहराचं भूषण मानलं जातं. मंगळवारी रात्री पुजाऱ्यांनी नित्य नियमित पूजा आटोपून मंदिर बंद केले. पुजारी संजय पतंगे पहाटे चारच्या सुमारास नित्य पूजेच्या निमित्ताने उठले. मंदिरात येण्यापूर्वीच सर्वप्रथम कळसाचं दर्शन घेण्याची त्यांची नेहमीची सवय होती. त्यानुसार त्याप्रमाणे पाहताच कळस चोरला गेल्याची त्यांच्या निदर्शनाला आले. त्यांनी तातडीने भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांना कल्पना दिली. तातडीने हालचाली गतिमान झाल्या होऊन आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्याशी साधून झाल्या प्रकाराची कल्पना दिली. पुजारी संजय निंबाळकर यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंदवली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी भा.दं. वि. ३७९ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास फौजदार सुरज निंबाळकर करीत आहेत.