बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जून 2018 (17:16 IST)

एस टी संप 1010 कर्मचाऱ्यांना पुन्हा नव्याने नियुक्ती

अघोषित संपात सहभागी झाल्याबद्दल एस.टीच्या स्थानिक प्रशासनाने ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याना आता पुन्हा सेवेत  घेण्याचे आदेश  रावते यांनी दिले आहेत. या आदेशप्रमाणे आता 1010 कर्मचाऱ्यांना पुन्हा नव्याने नियुक्ती देण्याबाबतचे आदेश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निर्गमित केले. एसटी कर्मचा-यांना सेवेत परत घेण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही रावते यांना दिले होते. 

कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2018 पासून नव्याने नियुक्ती दिली जाणार आहे. रोजंदारी कर्मचारी हामंडळाच्या सेवेत मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. कर्मचाऱ्यांचा अघोषित संपाशी काहीही संबंध नव्हता तरी देखील हे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे एस.टीचे आर्थिक नुकसान होतांना प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गैरसोय देखील झाली. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने अशा सर्व कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली होती. त्यामुळे आता या नवीन आदेशाने पुन्हा कर्मचारी सेवेत आल्याने खुश झाले आहेत.