suvichar

भाजपला त्रस्त जनतेला सत्ताबदल हवाय - सुनील तटकरे

Updated: शुक्रवार, 13 एप्रिल 2018 (16:53 IST)

ते पुढे म्हणाले की मॅग्नेटीक महाराष्ट्र, मेक इन महाराष्ट्र असे मोठे कार्यक्रम सरकारने घेतले. मोठा रोजगार यातून उत्पन्न होईल असे म्हटले गेले होते, पण तसे काहीही झाले नाही. भाजपची स्थापना होऊन अनेक वर्षे झाली. यांनी कधी स्थापना दिवस साजरा केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लाबोल आंदोलनाला घाबरून या सरकारने शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. भाजपचा हा प्रयत्नही फसला. मुख्यमंत्र्यांनी या सभेत शरद पवार साहेबांवर टीका केली. ही टीका करण्याची तुमची लायकीच नाही. तुम्ही गुडघ्यावर रांगत होतात, तेव्हा पवार साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, असे ते म्हणाले.

आजचे सरकार निव्वळ सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून पैशांसाठी येथे आहे. लोकांमध्ये भांडणे कशी लावून द्यायची? हे या सरकारला चांगले जमते. पण पुण्यातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. ती विल्हेवाट साडे तीन वर्षात लावली गेली नाही. पुण्यातील एकही प्रश्न या सरकारने सोडला नाही. सरकार सत्तेच्या धुंदीत मश्गुल आहे, असे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार  म्हणाले.

जे महत्त्वाच्या पदावर असतात ते कधीच उपोषणाला बसत नाहीत. जर सरकारमधील लोकच उपोषणाला बसले, तर यांचे उपोषण सोडवणार कोण? यांचे निवदेन घेणार कोण? यांचे ऐकून घेणार कोण? यांचे म्हणणे ऐकण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना बोलवायचे का?, असा सवाल त्यांनी केला.

या सरकारच्या काळात रोजगाराचा प्रश्न सुटला नाही. आघाडी सरकार असताना या भागात अनेक कारखाने, कंपन्या आणल्या गेल्या. या सरकारने मात्र एकही गुंतवणूक येथे आणली नाही. हे सरकार सर्व गोष्टी महाग देते. पण शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. मग मधला मलिदा जातो कुठे? ८ ते ९ वर्षांच्या मुलीवर आज बलात्कार होत आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रस्ते नीट नाहीत. सरकार काय करत आहे? ही जबाबदारी सरकारची नाही का? त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी हा हल्लाबोल आहे, असे ते म्हणाले.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments