राज्यपालांना महाराष्ट्रा बाहेर काढा : संभाजीराजे छत्रपती
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरच आता राज्यपालांना महाराष्ट्रा बाहेर काढा असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी हे सातत्याने अशी बडबड का करतात? हा प्रश्न मला पडला आहे. मी म्हणतो यांना महाराष्ट्र राज्याच्या बाहेर काढा. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती आहे की अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नको आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे वभाव आहेत आणि महापुरुषांबद्दल असले घाणेरडे विचार घेऊन कुणी राज्यात येऊच कसं शकतं. यांना अजून राज्यपाल पदी कसं ठेवलं जातं? असा प्रश्न विचारत संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor