मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (15:14 IST)

एकनाथ शिंदे आणि नीलम गो-हे यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

nilam gorhe
महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटनेवर लक्ष घालण्यासाठी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांची भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यानंतर एकनाथ शिंदे आणि नीलम गो-हे यांचीसुद्धा एक स्वतंत्र भेट झाली आहे. त्यामुळे नीलम गो-हेसुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
 
महाराष्ट्रातील वसई परिसरात राहणाऱ्या श्रद्धा हत्येप्रकरणी योग्य ते लक्ष घालून कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले असल्याची माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना मुंबईत दिली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते. मुंबईमध्ये झालेल्या भेटीदरम्यान या विषयावर त्यांनी चर्चा केली, डॉ. गोऱ्हे यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना लेखी निवेदन दिले.
 
 महाराष्ट्रामध्ये महिलांच्या सुविधांसाठी समाजामध्ये मोक्याच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास व्हावा. केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे महाराष्ट्रातील दुर्ग, मंदिरे याकडील दुर्लक्ष याकडे लक्ष वेधले. लष्करात आणि महत्त्वाच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आत्मसन्मानासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाव्यात. श्रद्धा वालकरच्या केसमध्ये पकडला गेलेला आरोपी याला फाशीची शिक्षा सुनावण्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, अशा स्वरूपाच्या मागण्या या निवेदनामध्ये त्यांनी केल्यात.

Edited By- Ratnadeep Ranshoor