मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 मार्च 2020 (10:19 IST)

मनसेचा आक्षेप, सब टिव्हीने माफी मागावी अशी केले मागणी

सब टिव्हीवरची मालिका तारक मेहता का उलटा चष्माच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात जेठालालचे वडील बापुजी यांच्या तोंडी, मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर आक्षेप घेतला असून…सब टिव्हीने याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे.
 
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर मनसेची भूमिका मांडत, हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता असल्याचं म्हटलं आहे. 
 
मुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही मालिकांमधून पद्धतीशीर अपप्रचार सुरु असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची शरम वाटत नाही याचीच शरम वाटत असल्याचं खोपकरांनी म्हटलंय.