1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (16:14 IST)

बुलढाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गटात तुफान राडा

uddhav shinde
बुलढाण्यात शिंदे आणि ठाकरे गटाचे युद्ध आता हाणामारीवर गेले आहे. बुलढाण्याच्या एपीएमसी मध्ये शिंदे आणि ठाकरे गटात तुफान राडा झाला एपीएमसी मध्ये नवनियुक्त कार्यकर्त्यांच्या सत्कार समारंभाच्या एका कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. आणि ठाकरे गटाचे सम्पर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, संजय हांडे यांच्या पोटात लाथ मारली तसेच उपजिल्हाप्रमुख आणि उपनेते लक्ष्मण वडले याना मारहाण करण्याचा आरोप या कार्यकर्त्यांवर आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र आणि कार्यकर्त्यांनी या समारंभात जाऊन राडा केल्याचा आरोप ठाकरे गटांनी केला आहे. राडा सुरु असण्याचा प्रकार 15 मिनिटे सुरु होता. पोलिसांनी कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला.