Festival Posters
✕

शिवभोजन थाळी २६ जानेवारीपासून सुरु होणार

Updated: शुक्रवार, 10 जानेवारी 2020 (10:15 IST)
 
या विभागातंर्गत येणाऱ्या सर्व सार्वजनिक वितरणव्यवस्थेचे सक्षमीकरण करुन वाजवी दरात आवश्यक वस्तूंची ग्राहकांना उपलब्धता करुन देणार आहे. सार्वजनिक वितरणासाठी आवश्यक असलेली साठवणूक क्षमता आधुनिक व सक्षम करणार आहे. प्रत्येक शिधापत्रिकेत, महिला सक्षमीकरणासाठी शिधापत्रिका कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंबातील ज्येष्ठ महिला सदस्याची निवड करणार आहे.
 
NFSAमध्ये अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांना प्रति महिना 35 किलो धान्य आणि पीएचएच / एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना प्रती महिना 5 किलो प्रती व्यक्ती धान्य दिले जात आहे. याव्यतिरिक्त, शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हे, विद्यार्थी वसतिगृहे,आश्रम शाळा, बालगृहे आणि कल्याणकारी संस्था यांना अनुदानित अन्नधान्य पुरवठा केला जाईल. हे उपक्रम अधिक चांगल्याप्रकारे राबविण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनामार्फत केली  जाईल.
 
दरम्यान भुजबळ यांनी रास्त भावधान्य दुकानदारांचे सक्षमीकरण, संगणीकृत सार्वजनिक वितरण व्यवस्था, सार्वजनिक व्यवस्थेद्वारे केरोसीन वितरण, सुधारीत धान्य वितरण प्रणाली, पसंतीनुसार थेट लाभ हस्तांतरण कल्याणकारी संस्था व वसतीगृह योजना, गोदाम व्यवस्थापन, तांदुळ फोर्टीफीकेशन, शिवभोजन योजनेच्या तयारीचा आढावा, भविष्यातील विभागाची वाटचाल, वैधमापन शास्त्र विभाग व ग्राहक संरक्षण विभागाची माहिती, विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

LIVE: नवरात्रीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रोन पाळत आणि सहा ठिकाणी नाकाबंदीसाठी

महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; पदोन्नतीसाठी असलेली ५० वर्षांची वयोमर्यादा रद्द

नवरात्रीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रोन पाळत आणि सहा ठिकाणी नाकाबंदी

हुथी बंडखोरांचा सौदी अरेबियाच्या रियाध विमानतळावर मोठा हल्ला, १२ ठार ३०० हुन अधिक जखमी

मी माझ्या गावी जात आहे, सुटकेनंतर अभिजीत दीपकेची पोस्ट, सीजेपी मागे हटणार नाही

पुढील लेख
Show comments