मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (21:11 IST)

गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात दोन सख्या भावांचा मृत्यू

गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना सिन्नर येथील मुसळगाव वसातहीतीमधील उज्ज्वलनगर परिसरात घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या स्फोटात दीपराज देवराज साकेत (१९) आणि कृष्णचंद्रा देवराज साकेत (२७), या दोन्ही भााचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही भाऊ मुळ राहणारे मध्यप्रदेशचे आहे. सध्या ते मुसळगाव येथे राहत होते. या घटनेत शुभम महादेव सोनवणे (१४) हा गंभीर भाजला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात साकेत बंधु नोकरीला होते. त्यांनी चहा बनवण्यासाठी गॅस पेटवला. पण, अगोदरच गॅस गळती झालेली असल्याने गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यात हे तिन्ही जण भाजले. त्यांना रुग्णांलयात उपचासाठी दाखल करण्यात आले. या उपचारा दरम्यानच दोघां भावांचा मृत्यू झाला.