शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (12:18 IST)

नाशिकच्या पंचवटीत गॅस सिलेंडर स्फोटात 6 जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

पेठरोड वरील कुमावतनगरात सकाळच्या सुमारास गॅस गळती होऊन स्फोट झाल्यासामुळे एकाच घरातील 6 जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
 
हा कुटुंब टाईल्स लावण्याचे काम करत असून परराज्यातून आलेला आहे. या कामगाराच्या घरात सकाळी सातच्या  सुमारास गॅस गळती होऊन स्फोट झाला आणि त्यात त्या कुटुंबियातील सहा जण जखमी झाले. कुटुंबियातील सदस्य कडून रात्री गॅस व्यवस्थितरित्या बंद न केल्यामुळे गॅस गळती झाली आणि सकाळी काडे पेटी पेटवल्यावर अचानक भडका झाला आणि त्यात लवलेश धर्म पाल , अखिलेश  धर्मपाल,  विजयपाल, संजय मौर्य, अरविंदपाल, सर्व रहिवाशी उत्तरप्रदेश जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितली जात आहे.