1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (10:20 IST)

मुलासाठी आई बिबट्यासोबत लढली

mother rescued child
फोडशेवाडी येथील एका सहा वर्षीय मुलावर बिबट्याने काल (बुधवारी) हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पण संबंधित मुलाच्या आईने आपल्या जीवाची पर्वा न करता, बिबट्याच्या अंगावरच झेप घेत, पोटच्या गोळ्याची मृत्यूच्या जबड्यातून सुटका केली आहे. 
 
यामुळे संबंथित मुलाचा प्राण वाचला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी आईनं केलेल्या धाडसाचं गावात कौतुक होतं आहे. कार्तिक काळू घारे असं बिबट्याने हल्ला केलेल्या मुलाचं नाव आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जात आहे. कार्तिकची प्रकृती सध्या स्थिर असून त्यामध्ये सुधारण होतं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. विशेष म्हणजे याच बिबट्याने सोमवारी दरेवाडी येथील एका दहा वर्षीय मलाचा बळी घेतल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे.