मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (08:32 IST)

बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय मुलगा जागीच ठार

A ten-year-old boy was killed on the spot in a leopard attack Maharashtra News Regional Marathi News Webdunia Marathi
नाशिक: इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते येथील दरेवाडी येथे सोमवारी सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एक १० वर्षीय मुलगा ठार झाला. दीपक विठ्ठल गावंडा असे त्याचे नाव असून बकऱ्या चारत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला.दीपकवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने त्याला तिथेच टाकून पळ काढला. परंतु, गंभीर जखमी झाल्याने दीपकचा जागीच मृत्यू झाला होता. मादी बिबट्या असून तिच्यासोबत ३ बछडेही असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, या भागात या आधीही अशा घटना मोठ्या प्रमाणात घडल्या असून परिसरात तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घटना घडूनही रात्री साडेसातपर्यंत वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.