दोन तमाशा कलाकारांची विष प्राशन करून आत्महत्या
धुळ्यातून तमाशा कार्यक्रमातून परतताना भुसावळ जाणाऱ्या भीका-नामा तमाशा मंडळातील दोन कलाकारांनी विषप्राशन करून आत्महत्या केली .अंजली अशोक नामदास(20) आणि सुनील उर्फ योगेश नामदेव बोरसे(19) असे या मयत कलाकारांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भीका-नामा तमाशा मंडळातील सदस्य बाभूळवाडी जिल्हा धुळेतुन तमाशाचे कार्यक्रम आटपून गुरुवारी दुसऱ्या ठिकाणी जात असताना पारोळा येथील कजगाव मार्गावरील पट्रोल पंपाजवळ त्यांचे वाहन बिघडले. या तमाशा मंडळीतील दोन कलाकार अंजली आणि सुनील आम्ही बाजारात जाऊन येतो. असे सांगून निघून गेले.
बऱ्याच वेळा नंतर देखील ते परत आले नाही. म्हणून त्यांची शोधाशोध झाली. ते मच्छीबाजारात सापडले पण त्यांनी विष घेण्याचे समजल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान अंजली हिची प्राणज्योत मावळली. तर 25 रोजी अनिल यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले पोलिसांनी प्रकरण नोंदवून अकस्मात मृत्यू ची नोंद केली असून पुढील तपास करत आहे.