शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जुलै 2020 (14:32 IST)

लोकलचा अंदाज चुकल्यामुळे दोन रेल्वे कर्मचार्यांमचा अपघाती मृत्यू

पश्चिम रेल्वे मार्गावर खार रेल्वे स्थानकादरम्यान लोकलची धडक बसून दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झालेल्याची धक्कादायक घटना मध्य रात्री समोर आली आहे. मृतक रेल्वे कर्मचाऱ्यांचेमध्ये पश्चिम रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर राजकुमार शर्मा ( ४८) आणि सिनियर ट्रकमन नागेश सखाराम सावंत (४०) अशी दोघांची नावे आहेत.
 
काय आहे घटना
मिळालेत्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेच्या बांद्रा रेल्वे फाटका क्रमांक १९ वर फाटकाचे दुरुस्तीचे काम सुरु होते. राजकुमार शर्मा आणि त्यांचे सहकारी सिनियर ट्रकमन नागेश सावंत हे दोघे खार रेल्वे स्थानकाच्या रेल्वे रुळावर उतरून पायी-पायी कामाच्या ठिकाणी जात होते. मात्र मागून लोकल ट्रेन येत होती. त्यांना वाटले ही लोकल खार रेल्वे स्थानकांवर थांबणार, मात्र लोकल जलद असल्यामुळे ती न थांबता भर धाव वेगाने पुढे आली. यांच्या अंदाज चुकला असताना बांद्रा रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या लोकलची जोरदार धडक बसून या दोघांच्या जागीच मृत्यू झालेला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर या दोघांचे मृतदेह वांद्रेतील भाभा रुग्णालयात नेण्यात आले. वांद्रे रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी  या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. सिनियर सेक्शन इंजिनियर राजकुमार शर्मा आणि नागेश सखाराम सावंत यांच्या मोठा मित्रपरिवार होता. या दोघांच्या  अपघाती मृत्यूनंतर पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.