दुचाकी चोराकडे सापडल्या सात लाखांच्या गाड्या
चंद्रपूर पोलिसांनी एका युवकाकडून चोरीच्या १४ दुचाकी जप्त केल्या आहे. हा युवक आंतरजिल्हा तसेच आंतरराज्यीय वाहनचोरीत सहभागी असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या महागड्या दुचाकीची एकूण किंमत जवळपास सात लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.प्रदीप शेरकुरे या युवकाला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले.
चंद्रपूर पोलिसांनी जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील एका युवकाला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. या वाहन चोराच्या ताब्यातून पोलिसांना १४ दुचाकी मिळाल्या असून या सर्व दुचाकी चंद्रपूरसह जवळच्या यवतमाळ जिल्हा व शेजारच्या तेलंगणा-आंध्र प्रदेश या राज्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे.