Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वर्षभरात केलेल्या ठोस कामांची यादी द्यायला हवी होती : भाजप

Updated: सोमवार, 26 ऑक्टोबर 2020 (09:46 IST)
 
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा संपूर्ण वेळ हा केंद्र सरकार आणि भाजपावर टीका करण्यात गेला. शिवसैनिकांना सुद्धा त्यांच्या सरकारने काय केले हे सांगण्यासारखे ठोस काही नसावे. पुढच्या महिन्यात काम काय केले ते सांगणार असे सांगून भाषणाचा वेळ घालवला. आजच्या भाषणात काहीच नव्हते. औरंगजेब, वाघ, कोथळा, महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडणार नाही या भाषेपलीकडे काहीच नव्हते, अशी टीका उपाध्ये यांनी केली. 
 
अनेक वर्षे हिंदुत्वाशी तडजोड नाही अशी भाषा करणारे उध्दव ठाकरे हे सत्तेसाठी हिंदुत्वापासून दूर गेलेच. पण ज्या स्वातंत्रवीर सावरकरांवर काँग्रेसने टीका केली त्याबद्दल त्यावेळी अवाक्षरही न काढणाऱ्या ठाकरेंना आज सावरकर स्मारकात यावे लागले हाच काळाचा न्याय आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 
 
राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीने ग्रासलाय, शेतकऱ्यांची व्यथा भाषणात सांगितली. पण त्याच शेतकऱ्यांना अवघे १० हजार रूपये देऊन चेष्टाच केली आहे. जीएसटी संदर्भात केंद्राने दिलेला प्रस्ताव देशातील २० पेक्षा अधिक राज्यांनी स्वीकारला व ते पुढे गेले. मात्र, राज्य सरकारला ठोस निर्णय घेण्यात कोणताही रस नाही. कोरोना हाताळण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले, अशी टीका त्यांनी केली. 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा झटका; कळंब नगरपरिषदेचे १० नगरसेवक भाजपच्या वाटेवर

साखरेचे भाव ६५ रुपये प्रति किलोवर; १५ दिवसांत १५ रुपयांची वाढ—भाव का वाढत आहेत?

सासूने ३ लाख रुपये देऊन सुपारी देऊन सूनची हत्या करवली; घाटकोपर हत्या प्रकरणाचा उलगडा, ५ जणांना अटक

LIVE: मुंबईतील १९ झोपडपट्ट्यांच्या 'क्लस्टर पुनर्विकासा'चे नियोजन; ६.१७ लाख घरे बांधण्याची तयारी सुरू

पुण्यात रीलस्टार तरुणीचा कॅफेबाहेर सातारच्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments