शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (16:25 IST)

राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असच पत्र लिहिल आहे का?

मुख्यमंत्र्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरांत यांनी थेट राज्यपालांच सवाल केला आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा पदभार असून, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्र लिहिलं आहे का?,” असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर राज्यपालांच्या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का, असंही थोरात यांनी म्हटलं आहे.
 
‘‘हिंदुत्ववादी असूनही गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील देव-देवतांना टाळेबंदीत ठेवण्यात आले आहे. प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष बनला आहात?’’ असा सवाल राज्यपालांनी केला. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ठामपणे उत्तर दिलं. ‘‘तुम्हाला घटनेतील धर्मनिरपेक्षता मान्य नाही का? माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही,” असं मुख्यमंत्री म्हणाले होते.