Daily Horoscope
✕

महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये उमेश कोल्हेची गळा चिरून हत्या... सोशल मीडियावर केली होती नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट

Updated: शनिवार, 2 जुलै 2022 (10:49 IST)
 
नुपूर शर्मा यांच्यावर एका टीव्ही चर्चेत पैगंबरांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यानंतर देशभरात मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. उमेश कोल्हे यांचा मुलगा संकेत कोल्हे याने दिलेल्या तक्रारीवरून अमरावती येथील सिटी कोतवाली पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून मुदासीर अहमद (22) आणि शाहरुख पठाण (25) या दोघांना 23 जून रोजी अटक केली होती.
 
पोलिसांच्या चौकशीत आणखी चार जणांचा सहभाग उघड झाला. त्यापैकी अब्दुल तौफिक (24), शोएब खान (22) आणि अतीब रशीद (22) या तिघांना 25 जून रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणातील दुसरा आरोपी शमीम अहमद फिरोज हा फरार आहे.
 
ही घटना 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान घडली. त्यावेळी उमेश कोल्हे हे त्यांचे अमित मेडिकल स्टोअर हे दुकान बंद करून घरी जात होते. यावेळी 27 वर्षीय संकेत आणि त्याची पत्नी वैष्णवी हे त्याच्यासोबत दुसऱ्या स्कूटरवर होते. संकेत याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही प्रभात चौकातून जात असताना आमची स्कूटर महिला महाविद्यालय न्यू हायस्कूलच्या गेटजवळ आली असता अचानक माझ्या वडिलांच्या स्कूटीसमोर मोटारसायकलवरून दोघे आले.
 
त्यांनी माझ्या वडिलांची दुचाकी अडवली आणि त्यातील एकाने त्यांच्या मानेच्या डाव्या बाजूला चाकूने वार केल्याचे संकेतने पोलिसांना सांगितले. त्यानंतर माझे वडील पडले आणि त्यांच्या शरीरातून रक्तस्त्राव झाला. मी माझी स्कूटर थांबवली आणि मदतीसाठी ओरडू लागलो. दुसरा एकजण आला आणि तिघांनी मोटारसायकलवरून पळ काढला.
 
आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने उमेश कोल्हे यांना जवळच्या ऍक्सॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अमरावती शहर पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींकडून अशी माहिती मिळाली आहे की त्यांनी दुसऱ्या आरोपीची मदत घेतली होती, ज्याने त्यांना पळून जाण्यासाठी कार आणि 10,000 रुपये दिले होते."
 
इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, “उमेश कोल्हेने नुपूर शर्माला सपोर्ट करणारी एक सोशल मीडिया पोस्ट व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्याचे तपासादरम्यान समजले आहे. चुकून त्याने ती पोस्ट मुस्लिम सदस्यांसोबत ग्रुपमध्ये शेअर केली. उमेशचे ग्राहकही त्या ग्रुपमध्ये होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने म्हटले आहे की, हा पैगंबराचा अपमान आहे आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला पाहिजे.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत दोन नवीन अभयारण्यांना मान्यता

इंडिगो आणि एअर इंडियाची उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित होणार

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत ७२.९६% विक्रमी मतदान! उमेदवारांचे भवितव्य २७ ऑक्टोबर रोजी ठरणार

‘महाराष्ट्राची सूत्र माझ्या हातात द्या, शिस्त आणण्यासाठी रॉकेट सायन्सची गरज नाही’; राज ठाकरेंची राज्यासाठी काय योजना?

महाराष्ट्रात पर्यावरण रक्षणासाठी मोठा उपक्रम, 2 नवीन वन्यजीव अभयारण्ये आणि 14 संवर्धन अभयारण्य घोषित

पुढील लेख
Show comments