शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 25 सप्टेंबर 2022 (10:39 IST)

वेदांता गुजरातला हे मविआचे पाप- चंद्रकांत बावनकुळे

chandrashekhar bawankule
"वेदांता प्रकल्प हा मविआ च्या काळातच गुजरातला गेला. दरम्यानच्या काळात सत्तेसाठी पैसा आणि त्याच पैशातून सत्ता असे समीकरण होते. आता आंदोलने करुन जनतेची फसवणूक केली जात आहे", असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे म्हणाले.
 
आदित्य ठाकरे हे खोटारडे असून त्यांनी राज्य सरकारवर केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे. वेदांता प्रकल्प हा तळेगावातच होणार होता तर त्यासाठी घेतलेली जागा त्यांनी दाखवून द्यावी असे आव्हानच त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे.
 
"वेदांता प्रकल्प हा मविआ च्या काळातच गुजरातला गेला. दरम्यानच्या काळात सत्तेसाठी पैसा आणि त्याच पैशातून सत्ता असे समीकरण होते. आता आंदोलने करुन जनतेची फसवणूक केली जात आहे. आंदोलन म्हणजे इव्हेन्ट मॅनेजमेंट झाले आहे. केवळ सत्ता गेल्याच्या नैराश्यातून ही आंदोलने होते आहेत", असं ते म्हणाले.