रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 25 सप्टेंबर 2022 (10:12 IST)

नांदेड : ट्रक आणि आयशर टेम्पोच्या अपघातात 5 जण जागीच ठार, 5 जखमी

नांदेड- किनवट महामार्गावर ट्रक आणि आयशर टेम्पोच्या भीषण अपघात झाल्याची घटना आज रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातात मृत आणि जखमी झालेले नागरिक बिहार मधून आलेले मजूर कामगार आहे. 
 
नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात करंजी फाट्यावर हा अपघात झाला असून या अपघातात पाच जण जागीच ठार झाले तर 5 जण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे मजूर कामगार हिमायत नगरचे रहिवासी आहे. हे कामगार काम करून घरी जायला निघाले असता ट्रक आणि टेम्पोची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघात वाहनांचा चक्काचूर झाला आणि 5 जण जागीच ठार झाले. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पुढील तपास सुरु आहे.