Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विखे भाजप सोडण्याच्या तयारीत?

Updated: गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (16:49 IST)
 
विखेंच्या श्रीरामपुरातील संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनास पक्षविरहित स्वरूप होते. त्यातच तेथील एका फ्लेक्सवर 'चलो एक पहल की जाए... नए रस्ते की ओर...' असे एक वाक्य लिहिलेले होते. त्यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाल आहेत.
 
विखे यांच्याविरूद्ध पक्षातील पराभूत आमदारांनी केलेल्या तक्रारींची चौकशी अद्याप सुरुच आहे. तर दुसरीकडे मधल्या काळात विखे पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आता हा नवा रस्ता कोणता, अशी चर्चा नगर जिल्ह्यात रंगली आहे. 
 
१५ हजारांच्या जात मुचलक्यावर फडणवीस यांना जामीन   
 
विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती दिली नसल्यामुळे नागपूर कनिष्ठ न्यायालयाने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले होते. त्यानुसार सुनावणी झाल्यानतंर १५ हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर फडणवीस यांना जामीन मंजूर केला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० मार्च रोजी होणार आहे.
 
जामिन मिळाल्यानतंर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, १९९५ ते १९९८ च्या दरम्यान झोपडपट्टी काढण्याच्या संदर्भात कारवाई सुरु असताना आम्ही आंदोलन केले होते. त्यावेळी माझ्यावर दोन खासगी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. नंतर त्या तक्रारी मागे घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे २०१४ च्या प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख मी केला नव्हता. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने मला समन्स बजावले होते. मी हजर राहिलो. मला पीआर बाँड देऊन पुढची तारिख दिली आहे. माझ्यावर कुठलीही वैयक्तिक केस नाही. सर्वच्या सर्व आंदोलनातील केस आहेत. या दोन केसचा उल्लेख करण्याचे कोणतेही कारण नव्हते.”

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा पुढाकार: मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी आणि ५ लाख रुपयांचे विमा धनादेश

महाराष्ट्रात पेपरफुटीनंतर 'ड्रग इन्स्पेक्टर' परीक्षा रद्द; प्रत्येक पेपर ४० लाखांना विकल्याचा रोहित पवारांचा दावा

LIVE: महाराष्ट्रात पेपरफुटीनंतर 'ड्रग इन्स्पेक्टर' परीक्षा रद्द; प्रत्येक पेपर ४० लाखांना विकल्याचा रोहित पवारांचा दावा

नांदेडमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; ३० वर्षांच्या तरुणाला अटक

पाकिस्तानच्या PIMS रुग्णालयात भीषण आग; १५ नवजात बालकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments