Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या मिटकरीला काय अक्कल आहे, हा बेअक्कल माणूस आहे

Updated: बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (07:59 IST)
 
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेच अमेय खोपकर यांच्या यापूर्वीही अनेकदा शाब्दीक चकमक झाली आहे. मात्र, आता हर हर महादेव चित्रपटाला राष्ट्रवादीने केलेल्या विरोधानंतर साम टीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना मिटकरी आणि अमेय खोपकर यांच्यातील संयम सुटल्याचे दिसून आले. दोघेही नेते एकमेकांवर अर्वाच्य भाषेत तुटून पडले. चौकातल्या पोरांप्रमाणे ही नेतेमंडळी टेलिव्हीजनवर भांडत होती. 
 
या मिटकरीला काय अक्कल आहे, हा बेअक्कल माणूस आहे, असे अमेय खोपकर यांनी म्हटले. त्यावर, मिटकरी यांनीही अरेरावी करत तू बेअक्कल आहेस, तुझा आणि इतिहासाचा काय संबंध, तुला काय इतिहास माहितीय, असे म्हणत आम्ही शिवप्रेमी संघटना चित्रपट बंद पाडणारच असे म्हणत भूमिका मांडली. त्यावर, तू ये उद्या मी ठाण्यात शो लावतोय, हिंमत असेल तर बंद करुन दाखव, असे म्हणत अमेय खोपकर यांनी मिटकरींना दमच भरला. आव्हाडांच्या नाकावर टिच्चून आम्ही उद्या शो लावतोय, तू येऊन दाखव, असं आव्हानही खोपकरांनी मिटकरींना दिलं. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: सातारा आणि पंढरपूरमध्ये माजी सैनिकांसाठी अत्याधुनिक सुविधा संकुले उभारली जाणार

अत्यंत पौष्टिक आणि जमिनीचा सुपीकपणा वाढवणारे पीक; वाल लागवड

माजी सैनिकांसाठी सातारा आणि पंढरपूरमध्ये अत्याधुनिक सुविधा उभारल्या जातील-शंभूराज देसाई

विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला, सरकारने गृहमंत्री हटवावेत, राहुल गांधी पत्रकार परिषदेत गरजले

तुकाराम मुंढे यांचा ऐतिहासिक निर्णय; शाळांच्या ५० मीटर परिसरात आता शीतपेये, वडा पाव, बर्गर आणि आईस्क्रीमवर बंदी!

पुढील लेख
Show comments