अजित पवार बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहणार का ?
महाविकास आघाडीतील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते अद्यापही पॉझिटिव्ह आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे ते आयसोलेशनमध्ये होते. मात्र, उद्या ३ जुलै आणि ४ जुलै रोजी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात नव्या सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. परंतु पवार बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाला सुरूवात झाली. वारंवार आवाहन केल्यानंतरही शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा त्याग करावा लागला आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.
महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. मात्र, या शपथविधी सोहळ्यानंतर आता येत्या अधिवेशनात नवनिर्वाचित सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.