संबंधित माहिती
- अमृता फडणवीसांनी आरोप केलेल्या बुकीला गुजरातमधून अटक, पोलिसांची माहिती
- व्हॉट्सअप ला स्टेट्स ठेवत तरुणाची आत्महत्या
- श्रीअंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांसाठी विविध सुविधा देण्यावर भर – पालकमंत्री दीपक केसरकर
- उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या हातानेच स्वत:चा पक्ष कसा संपवला-एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- नागपूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न
मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती
मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती छत्रपती संभाजीनगर :रविवारी मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये रेल्वेत असलेल्या महिला डॉक्टरांच्या तत्परतेमुळे एका महिलेची प्रसूती झाली.
मराठवाडा एक्सप्रेसने जालना रेल्वेस्थानक सोडल्यानंतर एका गरोदर महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. तेव्हा रेल्वेत कोणी डॉक्टर आहे का, याची शोधाशोध करण्यात आली. तेव्हा नांदेड येथील डॉ. अश्विनी इंगळे या रेल्वेत होत्या. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी मदतीसाठी धाव घेतली.
डॉ. इंगळे आणि इतर महिला प्रवाशांच्या मदतीने त्यांनी सदर महिलेची प्रसूती केली. सध्या बाळ आणि आई सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर रेल्वेची यंत्रणा मदतीसाठी सज्ज झाली होती. परंतु त्यापूर्वीच रेल्वेत डॉक्टर आणि महिला प्रवाशांच्या मदतीने प्रसूती झाली. मात्र मुकूंदवाडी येथून महिलेला पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. रेल्वेतील टीसी राकेशकुमार मीना, अभिषेककुमार यांनी महिलेला मदत मिळवून देण्यात पुढाकार घेतला.
