1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. आरती संग्रह
Written By वेबदुनिया|

भूपाळी श्रीकृष्णाची

ऊठि गोपाळजी जाई धेनूकडे। पाहती सौंगडे वाट तुझी धृ.।।
लोपली हे निशी मंद झाला शशी।
मुनिजन मानसीं व्याति तुजला।।1।।

भानु-उदयाचळीं तेज पुंजाळलें।
किसतीं कमळें जळामाजीं।।2।।

धेनुवत्सें तुला वाहती माधवा।
ऊठिंगा यादवा उशिर झाला।।3।।

ऊठिं पुरुषोत्तमा वाट पाहे रमा।
दाविं मुखचंद्रमा सकळिकांसी।।4।।

कनकपात्रांतरीं दीपरत्नें बरीं।
ओंवाळिती सुंदरी तूजलागीं।।5।।

जन्मजन्मांतरीं दास होऊं हरी।
बोलती वैखरी भक्त तुझे।।6।।

कृष्णकेशव करी चरणांबुज धरी।
ऊठिं गा श्रीहरी मायबापा।।7।।