1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. छत्रपती शिवाजी महाराज जयंती
Written By
Last Modified: सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 (05:15 IST)

छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस… सिहांसनाधीश्वर… योगीराज…श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !
 
शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा.. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
 
झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा… गर्जा महाराष्ट्र माझा… जय शिवराय
 
ही शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची
 
झाले बहू.. होतील बहू… पण शिवरायांसारखा कोणीच नाही
 
सह्याद्रीच्या कडेकपारीतून केवळ एकच आवाज गुंजतो… तो म्हणजे छत्रपती
 
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
 
वैकुंठ रायगड केला… लोक देवगण बनला… शिवराज विष्णू झाला.. वंदन त्याला…
 
शौर्यवान योद्धा… शूरवीर… असा एकच राजा जन्मला … तो आमुचा शिवबा.
 
निश्चयाचा महामेरु… बहुत जनांसी आधारु…अखंड स्थिती निर्धारु श्री छत्रपती
 
अतुलनीय… अलौकीक… अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती
जय भवानी.. जय शिवाजी! 
 
यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा
छत्रपती शिवाजी महाराज