शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

सोळा सोमवाराची पावित्र्य कहाणी : उपवास करत असाल तर हे वाचा ...

श्रावणाचा महिना हा महादेवाला फारच प्रिय आहे कारण श्रावणाच्या महिन्यात सर्वात जास्त मेघसरी बरसण्याची शक्यता असते. हा महिना देवांचे देव महादेवांच्या गरम देहाला थंडावा देतो. या दरम्यान व्रत-कैवल्य आणि पूजा पाठ करणे श्रेष्ठ मानले गेले आहेत.
 
या महिन्यात तप आणि पूजा केल्याने शिव लवकर प्रसन्न होतात. भगवान शंकराने खुद्द सनतकुमारांना श्रावणाच्या महिन्याचे वर्णन करताना सांगितले आहे की त्यांचा तिन्ही डोळ्यांमध्ये जसे उजव्या डोळ्यात सूर्य, डाव्यात चंद्र आणि मध्य डोळ्यामध्ये अग्नी आहे. या मंत्राद्वारे सोमवाराचे संकल्प केले जाते.
: मम क्षेमस्थैर्यविजयारोग्यैश्वर्याभिवृद्धयर्थं सोमव्रतं करिष्ये'
हे आहे ध्यान मंत्र -
'ध्यायेन्नित्यंमहेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांग परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम्‌। पद्मासीनं समंतात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्‌॥
‘ॐ नमः शिवाय' पासून शिवाचे आणि 'ॐ शिवायै' नमः पासून पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी.
 
ही आहे सोमवारची खास कहाणी :
एकदाची गोष्ट आहे श्रावणाच्या महिन्यात अनेको ऋषी-मुनी क्षिप्रा नदी उज्जैन येथे स्नानादी करून महाकाळाच्या शिवाची पूजा अर्चना करण्यासाठी एकत्र झाले होते. तेथे आपल्या रूपाच्या गर्वात मातलेली एका घाणेरड्या विचारांची एक स्त्री ऋषींच्या धर्मभ्रष्ट करण्यास निघाली.
 
तेथे पोहोचल्यावर ऋषींच्या तपाच्या बळाच्या प्रभावाखाली तिच्या शरीराच्या सुवास नाहीसा झाला. ती आश्चर्यचकित होऊन आपल्या शरीरास बघू लागली तिला वाटू लागले की तिचे सौंदर्य देखील नष्ट झाले आहेत.
 
तिच्या बुद्धीत बदल झाला असून ती विरक्तीच्या मार्गाकडे जाऊ लागली आणि तिचे मन भक्ती-मार्गा कडे वळू लागले. तिने आपल्या पापांच्या प्रायश्चित्त करण्यासाठी ऋषींकडे विचारणा केली, ते म्हणाले - आपण आपल्या सोळा शृंगाराच्या बळावर कित्येक जणांचे धर्मभ्रष्ट केले, हे केलेले पाप नाहीसे करण्यासाठी आपण सोळा सोमवाराचे व्रत-कैवल्य करून आणि काशी येथे वास्तव्यास करून भगवान शिवाची पूजा करावी.'
 
हे ऐकल्यावर त्या स्त्रीने असेच केले व आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी शिवलोकात पोहोचली. भगवान शिवाच्या कृपादृष्टीमुळे ती आपल्या सर्व पापांतून मुक्त झाली. तेव्हापासून आपल्या आचरणेच्या शुध्दते साठी सोळा सोमवाराचे पावित्र्य व्रत-कैवल्य केले जाते.
 
सोळा सोमवारच्या व्रत-कैवल्याने मुलींना सुंदर पती मिळतात आणि पुरुषांना देखील सुंदर पत्नी मिळते. बारा महिन्यात श्रावणाच्या महिन्याचं वैशिष्ट्य आहे. या महिन्यात शिवाची पूजा केल्यास सर्व देवांच्या पूजेची फलप्राप्ति होते.
 
ही कहाणी केल्यावर शिवाची आरती करून नैवेद्य वाटावा. त्यानंतरच जेवण किंवा फलाहार करावा.