श्रावण महिना 2020 : शिव खुद्द पाणी असल्यामुळे श्रावणात पाणी वाया घालवू नये वाचवावं....
पौराणिक कथेनुसार श्रावणात समुद्र मंथन झाले असे. मंथनच्या वेळी समुद्रातून विष निघालं. भगवान शंकराने हे विष आपल्या घशात घेऊन साऱ्या सृष्टीचे रक्षण केले होते. म्हणून या महिन्यात शिवपूजन केल्याने त्यांची विशेष कृपादृष्टी मिळते.
पाणी अर्पण करण्याचे महत्त्व : भगवान शंकराची मूर्ती आणि शिवलिंगावर पाणी अर्पण करण्याचे महत्त्व देखील समुद्र मंथनाच्या कथेशी निगडित आहे. अग्नीसम विष घेतल्यानंतर शिवांचा घसा निळा झाला. त्या विषाचा दाह कमी करण्यासाठी साऱ्या देवी देवतांनी त्यांना थंडावा देण्यासाठी पाणी अर्पण केले. म्हणून शिवपूजन मध्ये पाण्याचे विशेष महत्त्व आहे.
शिव स्वतःच पाणी आहे
शिव पुराणात म्हटलं आहे की भगवान शिव स्वतःच पाणी आहे.
संजीवनं समस्तस्य जगतः सलिलात्मकम्।
भव इत्युच्यते रूपं भवस्य परमात्मनः ॥
म्हणजेच जे पाणी जगातील साऱ्या प्राण्यांमध्ये जीवन देतं ते पाणी खुद्द त्या परमात्मा शिवाचे रूप आहे. म्हणून पाणी वाया घालवू नये तर त्याचे महत्त्व समजून त्याची पूजा केली पाहिजे.
शिवपुजनात रुद्राक्षाचे देखील विशेष महत्त्व आहेत. पुराणानुसार भगवान रुद्रांच्या डोळ्यातून निघालेल्या अश्रू मधून रुद्राक्ष जन्माला आला आहे, म्हणून रुद्राक्ष भगवान शंकराला खूप प्रिय आहे.