सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 1 जुलै 2020 (12:37 IST)

संपत्ती पाहिजे ? भरपूर पाहिजे ? तर मग या 12 चांगल्या सवयी लावा

पैसे मिळवण्याचे बरेचशे मार्ग आहेत. पण प्रत्येकाला सरळ आणि सोपा मार्ग हवा असतो. येथे आम्ही आपणास अतिशय सरळ आणि सोपे उपाय सांगत आहोत. आपण आपल्या सोयीनुसार त्यापैकी कोणताही 1 उपाय अमलात आणू शकता. आपण फक्त नियमाने त्याचे पालन केले पाहिजे. 
 
* दररोज शिवलिंगावर पाणी, बेलपत्र, आणि तांदूळ अर्पित करावे.

* महालक्ष्मी आणि श्री विष्णूंची पूजा करावी.

* आठवड्यातून कोणत्याही एक दिवस उपवास करावा. 
सोमवारचा उपवास केल्यास धनाचे देव चंद्र प्रसन्न होतील, 
मंगळवारचा उपवास केल्यास मारुती, 
बुधवारचा उपवास केल्यास श्री गणेश, 
गुरुवारचा उपवास केल्यास श्री विष्णू, 
शुक्रवारचा उपवास केल्यास देवी आई लक्ष्मी, 
शनिवारचा उपवास केल्यास शनिदेव 
आणि रविवारचा केल्यास सूर्यदेव प्रसन्न होऊन धन, सुख, आणि सौभाग्य देतील.
 
* लहान बोटात(अनामिकेत) सोनं, चांदी किंवा तांब्याची अंगठी घालावी. 
 
* संध्याकाळी जवळच्या देऊळात जाऊन दिवा लावा.
 
* पौर्णिमेला चंद्राचे पूजन करावे.
 
* श्रीसूक्ताचे पठण करावं.
 
* श्री लक्ष्मीसुक्ताचे पठण करावं.
 
* कनकधारा स्तोत्रचे पठण करावं.
 
* कोणाचे ही वाईट करू नये.
 
* पूर्णपणे धार्मिक आचरण ठेवा.
 
* घरात स्वच्छता ठेवा, अश्याने आपल्या घरात पैसा कायमस्वरूपी राहील.