रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जून 2020 (20:20 IST)

या 10 गोष्टींमध्ये आपलं आयुष्य बदलण्याची क्षमता

आयुष्य बदलण्याची इच्छा असल्यास हिंदू धर्मातील हे 10 ज्ञान जाणून घ्या. आनंद, संपत्ती, निरोगी शरीर आणि सर्व प्रकाराची शांती मिळेल.
 
1 गीता : वेदांचे ज्ञाना नव्या पद्धतीने व्यवस्थित केले असेल तर ते भगवान श्रीकृष्ण आहे. गीतेच्या भक्ती, ज्ञान आणि कर्माच्या मार्गाला समजून घेतले नाही तर काहीच समजलं नाही.
 
2 योग : योग धर्म आणि अध्यात्माचा वैज्ञानिक मार्ग आहे. या माध्यमाने आयुष्य बदलू शकतं. योग प्रामुख्याने ब्रह्मयोग आणि कर्मयोगामध्ये विभागलेला आहे. पतंजलीने योगाला एक व्यवस्थित आकार दिला आहे. योग सूत्र योगाचे सर्वात उत्तम ग्रंथ आहे.
 
3 आयुर्वेद : आयुर्वेदानुसार आयुष्य जगण्याने कोणत्याही प्रकारांचे आजार आणि दुःख होत नाही. आयुर्वेदाचे पहिले उपदेशक ऋषी धन्वंतरी आहे. तत्पश्चात च्यवन, सुश्रुत आणि चरक ऋषी प्रामुख्याने आहे. अश्विनी कुमार यांनी चिकित्सा शास्त्र शोधले आहे. 
 
4 षड्दर्शन : भारतातील या सहा तत्त्व ज्ञानामध्ये जगातील सर्व धर्म आणि दर्शनाचे सिद्धांत आहे. हे 6 दर्शन आहे- 1. न्याय, 2. वैशेषिक, 3. मीमांसा, 4. सांख्य 5. वेदांत आणि 6. योग.
 
5 ज्योतिषशास्त्र : ज्योतिषशास्त्रामध्ये बरेच भाग आहेत. सामुद्रिक शास्त्र, हस्तरेखा विज्ञान, अंक शास्त्र, अंगठा शास्त्र, ताड़पत्र विज्ञान, नंदी नाड़ी ज्योतिष, पंच पक्षी सिद्धांत, नक्षत्र ज्योतिष, वैदिक ज्योतिष, रमल शास्त्र, पांचा विज्ञान इत्यादी. ज्योतिष म्हणजे वेदांचा डोळा असे म्हटले गेले आहे. 
 
6 वास्तू शास्त्र : वास्तुशास्त्रानुसारच यज्ञमंडप, देऊळ, घर आणि शहर बांधले जाते. दक्षिण भारतात वास्तू विज्ञानाचा पाया मय दानवाने ठेवला, तर उत्तर भारतात विश्वकर्माने. वास्तुशास्त्रानुसार घर असल्यावर सर्व सुख मिळतात आणि आयुष्य सुखी होतं.
 
7 यज्ञ : यज्ञाला विधी किंवा संस्कार मानू नये. वेदानुसार यज्ञ 5 प्रकारांचे असतात. 1. ब्रह्मयज्ञ, 2. देवयज्ञ, 3. पितृयज्ञ, 4. वैश्वदेव यज्ञ आणि 5. अतिथी यज्ञ. देव यज्ञालाच अग्निहोत्र कर्म म्हटले गेले आहे. यज्ञाचे तपशील आयुर्वेदामध्ये मिळतं.
 
8 तंत्र शास्त्र : तंत्राला मुळात शैव आगम शास्त्राशी निगडित म्हटले आहे. पण ह्याचे मूळ अथर्ववेदामध्ये आहे. तंत्रशास्त्र 3 भागांमध्ये विभागलेले आहे. आगम तंत्र, यामलतंत्र आणि मुख्य तंत्र. तंत्र ज्ञानाच्या माध्यमातून एखादा व्यक्ती आपल्या आत्मशक्तींना विकसित करून विविध शक्तीने संपन्न होऊ शकतो. 
 
9 मंत्र मार्ग: मंत्र म्हणजे मनाला व्यवस्थित करणे जेव्हा मन मंत्राच्या अधीन होतं तेव्हा ते पूर्ण होतं. प्रामुख्याने मंत्र 3 प्रकाराचे असतात. 1. वैदिक मंत्र, 2. तांत्रिक मंत्र आणि 3. शाबर मंत्र.
मंत्र जपाचे 3 भेद आहे - 1. वाचिक जप, 2. मानस जप आणि 3. उपाशु जप.
 
10 जाती स्मरण मार्ग : गत जन्माला जाणून घेण्यासाठी केला जाणारा प्रयोग जाती स्मरण म्हटला जातो. नित्यक्रम सतत सुरू ठेवून मॅमरी रिव्हर्स वाढवणेच जाती स्मरण विधी आहे. उपनिषद मध्ये जागृत, स्वप्न आणि झोपे बद्दल विस्तृत उल्लेख दिले आहे. हे जाणून घेतल्यावर गतजन्माला जाणून घेऊ शकतो.