बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (08:07 IST)

Pithori Amavasya 2023 पिठोरी अमावस्या, संपूर्ण माहिती जाणून घ्या

Pithori Amavasya 2023
Pithori Amavasya 2023 पिठोरी अमावस्या हा सण यंदा गुरुवार, दिनांक 14 सप्टेंबर 2023 या दिवशी साजरा केला जाणार आहे.
अमावस्या तिथी सुरूवात - 14 सप्टेंबर 2023 सकाळी 04.48 वाजता
अमावस्या तिथी समाप्त - 15 सप्टेंबर 2023 सकाळी 07:09 वाजता
 
पंचांगानुसार पिठोरी अमावस्या श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला येते. याला श्रावण अमावस्या, पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. तसेच या दिवशी बैल पोळा सण देखील साजरा केला जातो.
 
पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत - पूजा करतात. 
 
या प्रकारे करावे पूजन
या व्रत सुवासिनी स्त्रिया करतात. या दिवशी उपवास करुन सायंकाळी स्नान करतात. घरातील मुलांस अगर मुलीस खीरपुरीचे वायन देतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. या दिवशी खीर-पुरी, पुरणपोळी, साटोरी, असे पदार्थ तयार करुन खांद्यावरुन मागे नेत अतीत कोण? असा प्रश्न विचारतात. मुलाचे नाव घेऊन या प्रश्नाचे उत्तर देतात. अशा रीतीने व्रत पूर्ण केले महणजे अखंड सौभाग्य व दीर्घायु अपत्य होतात. पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृ दिन असे ही म्हणतात.
 
या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्याराशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतं.
 
तसं तर या दिवशी सकाळी पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा आहे. परंतु असे शक्य नसल्यास पवित्र नदीचं पाणी आपल्या अंघोळीच्या पाण्यात मिसळून स्नान करावे.
अमावस्या तिथी पितरांची तिथी देखील मानली जाते म्हणून या दिवशी पिंड दान व तरपण करण्याचे देखील महत्त्व आहे.
या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना चपला, छत्री, शॉल व इतर वस्तू दान करावे.
शक्य असल्यास पुरी भाजी, शिरा तयार करून गरिबांना आणि विशेष करून लहान मुलांना खाऊ घालावा.
या दिवशी 64 देवींची पूजा आराधना केली जाते. या दिवशी आपल्या कुटुंबाची आणि मुलांच्या समृद्धीची प्रार्थना केली जाते. त्यांना दीर्घायू प्राप्त हो अशी प्रार्थना करावी.
या दिवशी क‍णकेने देवी प्रतिमा तयार करून पूजा करावी. आपल्या आवडीप्रमाणे त्यांना रंग देणे, सजवणे, वस्त्र परिधान करवणे हे देखील करता येऊ शकतं.
काही क्षेत्रांमध्ये देवी दुर्गेला योगिनी रूपात पुजतात. म्हणून प्रत्येक देवी अर्थात 64 योगिनींची पूजा केली जाते. या सर्व मुरत्या एका चौरंगावर किंवा पाटावर मांडाव्या.
त्यांना दागिने घालायचे असल्यास बेसनच्या पिठाचे दागिने तयार करावे. सवाष्णीचे सर्व दागिने तयार करून देवीला सजवावे.
अलीकडे त्यांची छापील चित्रे मिळतात.
त्यावर हळदी ,कुंकू, अक्षता, हार, फुल, आघाडा, 108 मण्यांची कापसाची माळ इत्यादी अर्पण करावे
तसेच काही ठिकाणी वाळूने आठ लहान डोंगर तयार करुन त्यापुढे काकडीचे पान आणि त्यावर काकडीचे काप ठेवून पूजा केली जाते.
आठ छोट्या पुरणपोळ्या/ स्वयंपाक बनवून त्यादेखील काकडी च्या पानावर ठेवतात.
पूर्ण विधिपूर्वक पूजा झाल्यावर आरती करावी. देवीला नैवेद्य दाखवावा.
व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करावे. बेदाणे घातलेली भाताची खीर हा ‘पिठोरी’चा खास नैवेद्य.
खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आईने ते डोक्यावर घेऊन ‘अतिथी कोण? असा प्रश्न विचारावा. मुलांनी ‘मी आहे’ असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.
या दिवशी सप्तमातृका पूजा देखील केली जाते. शिव आणि शक्ती यांच्याद्वारे उत्पन्न 7 दिव्य माता ज्यांचे नावे ब्राह्मणी, वैष्णवी, महेश्वरी, कुमारी, वाराही, इंद्राणी, चामुंडी असे आहेत त्यांची पूजा केली जाते. नंतर शिवाद्वारे शक्ती योगेश्वरी उत्पन्न झाली. या देवीला आठवे स्थान प्राप्त झाले. म्हणून पिठोरी अमावास्येला 64 योगिनी आणि सप्तमातृकेची पूजा केली जाते.
पिठोरी अमावस्या व्रत केल्याने मुलं स्वस्थ, बुद्धिमान आणि शौर्यवान बनतात.
 
पिठोरी अमावस्येचे महत्व
पिठोरी अमावस्येला उपवास केल्याने अपत्यप्राप्ती होते.
ज्या माता हे व्रत करतात त्यांना त्यांच्या मुलांचे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते.
या दिवशी स्त्रिया पीठाने देवी दुर्गासह ६४ देवींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात.