शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 20 सप्टेंबर 2017 (09:22 IST)

जपान ओपन स्पर्धेसाठी सात्विकसाईराज पात्र

टोकियो:भारताचा युवा दुहेरी खेळाडू सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी याने मिश्र व पुरुष दुहेरीच्या पात्रता फेरीत एकाच सत्रात चार सामने खेळताना अफलातून क्षमतेचे दर्शन घडवीत या दोन्ही गटांत जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत धडक मारली.
 
आंध्र प्रदेशच्या केवळ 17 वर्षे वयाच्या सात्विकसाईराज रॅंकिरेड्डीने चिराग शेट्टीच्या साथीत खेळताना पहिल्या पात्रता फेरीत हिरोकात्सू हाशिमोटो व हिरोयुकी साएकी या जपानच्या जोडीचा 14-21, 22-20, 21-18 असा पराभव केला. तसेच सात्विक-चिराग जोडीने दुसऱ्या पात्रता फेरीत केईचिरो मात्सुई व योशिनुरी ताकेउची या जपानच्याच जोडीवर 21-18, 21-12 अशी मात करताना पुरुष दुहेरी गटात मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान मिळविला. सात्विक-चिराग जोडीसमोर पहिल्या फेरीत मार्कस फेरनाल्डी व केविन संजया या तृतीय मानांकित कोरियन जोडीचे आव्हान आहे.
 
सात्विकने नंतर अश्‍विनी पोनप्पाच्या साथीत हिरोकी मिदोरिकावा व नात्सू साईतो या जपानी जोडीवर 21-13, 21-15 अशी मात केली. तर दुसऱ्या पात्रता फेरीत हिरोकी ओकामुरा व नारू शिनोया या जपानी जोडीचा 21-18, 21-9 असा पराभ” करताना सात्विक-अश्‍विनी जोडी मिश्र दुहेरीच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरली. त्यांच्यासमोर सलामीला टिन इस्रियानेट व पाचारपुन चोचुवोंग या इंडोनेशियन जोडीचे आव्हान आहे.