Festival Posters
✕

फिफा विश्‍वचषक स्पर्धा; पराभवामुळे विरला पहिल्या गोलचा आनंद

Updated: बुधवार, 11 ऑक्टोबर 2017 (09:56 IST)
 
अर्थात 17 वर्षांखालील फिफा विश्‍वचषक स्पर्धेतील या पराभवानंतरही भारतीय संघाची मान ताठ होती. त्यातही जीकसन सिंगने फिफा विश्‍वचषक स्पर्धेतील भारताचा पहिलावहिला गोल नोंदविल्यामुळे त्याच्यावर प्रकाशझोत होताच. परंतु भारताला या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे ऐतिहासिक गोल करण्याचा आनंद विरला, अशी कबुली जीकसनने सामन्यानंतर दिली.
 
आमची या सामन्यात विजय मिळविण्याची क्षमता होती आणि पात्रताही. परंतु नशिबाने साथ न दिल्यामुळे आमचा विजय हुकला, असे सांगून जीकसन म्हणाला की, भारताने विजय मिळविला असता, तरच माझ्या गोलला अर्थ होता. अर्थात या पराभवातून आम्हाला मोठा धडा मिळाला आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण करताना असे धडे आवश्‍यकच असतात. आम्ही यातून शिकून आमच्यात निश्‍चितच सुधारणा घडवून आणू.
 
मणिपूरमधील हावखा ममांग या खेड्यातील जीकसन हा रहिवासी. त्याच्या वडिलांना दोन वर्षांपूर्वी हृदयविकारामुळे मणिपूर पोलीस दलातील नोकरी सोडावी लागली. त्यानंतर आईने भाजीपाला विकून मिळविलेल्या तुटपुंज्या कमाईवर त्याच्या कुटुंबाची गुजराण होत होती. दरम्यान जीकसनला दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय निवड समितीने पसंती दिली नाही. परंतु या धक्‍क्‍यातून सावरून त्याने फिफा 17 वर्षांखालील भारतीय संघात स्थान मिळविण्यापर्यंत मजल मारलीच.
 
आता वरिष्ठ संघात स्थान मिळविण्याचे जीकसनचे स्वप्न आहे. काही झाले तरी फिफा विश्‍वचषक स्पर्धेत भारताचा पहिलावहिला गोल नोंदविणारा खेळाडू म्हणून इतिहासात त्याचे नाव अजरामर झाले आहेच.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

दमदार लूक आणि जबरदस्त फीचर्ससह नवीन Honda CB500 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

नागपूर डेंटल कॉलेजमध्ये उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्याचे रॅगिंग; विवस्त्र करत 'मुर्गा' बनवून अश्लील कृत्य करण्यास पाडले भाग

'गोकुळ'च्या खटल्यासाठी ८० लाखांची फी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद, काँग्रेसचा सरकारवर जोरदार प्रहार

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! अवघ्या ५२ चेंडूत ठोकले द्विशतक, मोडीत काढले अनेक दिग्गजांचे विक्रम

LIVE: शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांचे उत्तर

पुढील लेख
Show comments