Daily Horoscope
✕

आजपासून सुरू जागतिक बॅडमिंटन स्पर्धा

Updated: सोमवार, 21 ऑगस्ट 2017 (11:40 IST)
 
सिंधुने 2013 आणि 2014मध्ये सलग कांस्य पदक जिंकले होते. मात्र, पुरूष वर्गात कोणत्याही खेळाडूला पदक जिंकता आले नाही. यंदाच्या मोसमात के. श्रीकांतने सलग दोन सुपर सीरीज जिंकल्याने या स्पर्धेत त्याच्याकडून पदक जिंकण्याची अपेक्षा वाढल्या आहेत. मागील वर्षी दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या श्रीकांतने यावर्षी इंडोनेशिया ओपन आणि ऑस्ट्रेलिया ओपनचा किताब जिंकून नवीन इतिहास रचला होता.
 
या स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा थेट दुसऱ्या फेरीत कोरियाच्या किम ह्यू मिन किंवा इजिप्तच्या हदाया होस्नी हिच्याशी लढत होणार आहे. त्यानंतर उपान्त्यपूर्व फेरीत तिची लढत चीनच्या शून यू हिच्याशी होणार आहे.
 
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेपूर्वी के. श्रीकांत म्हणाला की, या स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्याबाबत मी विचार करत नसून, प्रत्येक स्पर्धेप्रमाणे एक-एक टप्पा पार करत पुढील रणनीती आखत खेळणार आहे. तसेच या स्पर्धेच्या तयारीसाठी मी ऑस्ट्रेलिया ओपननंतर अमेरिका आणि न्यूझीलंड ओपन स्पर्धेत सहभागी झालो नाही, असे त्याने सांगितले. पुरुष एकेरीत श्रीकांतशिवाय समीर वर्मा, अजय जयराम आणि बी. साई प्रणीत आदी खेळाडू भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

Cyclone Arnab पुढील ४८ तासांसाठी महाराष्ट्रात पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर: एटीएसच्या कारवाईनंतर ॲप-आधारित बाईक-टॅक्सी चालकांचे बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन होणार

LIVE: महाराष्ट्र सरकार ओला, उबर आणि रॅपिडोवर कारवाई करण्याच्या तयारीत

संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या! सर्वोच्च न्यायालयात व्यक्तिशः हजर राहण्याचे आदेश

मुंबईतील वायू प्रदूषणाविरोधात बीएमसीची कठोर कारवाई; बिल्डरांना नोटिसा तर बांधकाम स्थळांवरील काम थांबवण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments