बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सायनावर सिनेमा, श्रद्धा कपूर साकारणार भूमिका

बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सायनाची भूमिका साकारणार आहे. याबाबत स्वत: श्रद्धा कपूरने याबाबत इन्स्टाग्रामवर माहिती दिली. प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते हे सायनावरील सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.
सिनेमाबाबत बोलताना सायना म्हणाली, मला माहित होतं की, माझ्या आयुष्यावर सिनेमा बनवला जातो आहे. मात्र, माझी भूमिका कोण करत आहे, हे माहित नव्हते. त्यामुळे श्रद्धा कपूर माझी भूमिका साकारणार असल्याचं कळल्यावर आनंद झाला आहे. श्रद्धा खूप सुंदर आणि मेहनती आहे. मला पूर्ण खात्री आहे की, श्रद्धा अत्यंत उत्तमपणे भूमिका साकारेल. सायना पुढे म्हणाली, आनंदाची बाब म्हणजे, श्रद्धा माझी जवळची मैत्रिण आहे. सिनेमात उपयोगी पडतील, अशा बॅडमिंटनबाबत तिला नक्की टिप्स देईन.